• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
September 11, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Ramdara to Ekuraka
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे.   आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली आहे.  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या मागणीवरून प्राधान्यक्रमात  टप्पा क्रमांक ६ चा समावेश केला आहे. त्यामुळे तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन तालुक्यात पाणी वितरणाची व्यवस्था निर्माण झाल्यावर सुमारे ७ हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या ७ टीएमसी पाण्यापैकी २.२४ ‘टीएमसी’ पाणी या तीन तालुक्यात खळाळणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(Ramdara to Ekuraka)

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला. त्यावेळी टप्पा क्रमांक सहा मधील कामांचा समावेश प्राधान्यक्रमात घेण्यात यावा अशी मागणी आपण विखे पाटील साहेब यांच्याकडे केली होती. त्याला आता मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १५, उमरगा तालुक्यातील १४ व लोहारा तालुक्यातील ६ अशा एकूण ३५ गावांतील सात हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेअंतर्गत रामदारा तलावातून ८५ किलोमीटर बंद कालव्याद्वारे कृष्णेचे पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या तीन मध्यम प्रकल्प, पाच साठवण तलाव आणि नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या दोन बॅरेजेस जोड कालव्याद्वारे एकूण दहा साठवण तलावांमध्ये भरण्यात येणार आहे. त्यातून या भागातील ३५ गावाच्या सिंचनाची सोय होणार आहे. या टप्प्यासाठी अंदाजे रुपये ४२० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष लक्ष असून त्यांच्या सहकार्यामुळे  ११,७०० कोटी रुपयांच्या कामांना महायुती सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली व वेळोवेळी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली त्यानंतरच या कामांना गती मिळाली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक २ मधून टप्पा क्र. १ ते ५ चे काम अंतिम टप्प्यात आहे. कृष्णेचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या न्याय हक्काचे आहे. त्यापैकी ७ टीएमसी पाण्यासाठी सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी २.२४ टीएमसी पाणी उपसा योजना क्रमांक दोनमधून तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. सध्या ऊर्ध्व नलिका व जोड कालव्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील घाटणे बॅरेजच्या भोयरे पंप हाउसमधून तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पाणी लवकरच येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

Next Post
Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tulja Bhaavani College of Engineering

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

6 months ago
Tuljapur employment fair

Tuljapur Employment Fair : शासकीय योजनांचा लाभ घेत युवक बनले यशस्वी उद्योजक

6 months ago
local body election maharashtra 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

6 months ago
2215 crores assistance to farmers CM Devendra Fadnavis

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.