अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अशातच, माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचा मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. भूम परंडा येथील एकही गाव सुटता कामा नये, सरसकट पंचनामे करा, अशा सूचना परंड्यातील तहसीलदारांना फोनवरून आमदार सावंत यांनी दिल्या. (MLA Sawant’s instructions to tehsildars)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मदतीबाबत बोलणार
पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, एकही गट, गण, गाव वगळू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू, तुम्ही पंचनामे करा. असं म्हणत तानाजी सावंत यांनी त्यांच्या मतदारसंघातील तहसीलदर यांना फोनवरून सूचना केल्या आहेत. मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्यासंदर्भात सावंतांनी थेट पुण्यातून हे आदेश दिले आहेत.