• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, February 23, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजापूरमध्ये उमेद मॉल, शासन निर्णय जारी ; आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती मागणी

Terna Vruttant by Terna Vruttant
January 2, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Umed Mall Tuljapur

Umed Mall Tuljapur

108
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : जिल्ह्यासाठी आणि विशेषतः श्री क्षेत्र तुळजापूरसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तुळजापूर येथे “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र)” साकारण्यात येणार आहे. महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू व उत्पादनांना हक्काची, कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

या निर्णयासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात ठामपणे मागणी मांडली होती. तुळजापूरसारख्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी उमेद मॉल उभारल्यास ग्रामीण महिलांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होईल, असा मुद्दा त्यांनी शासनासमोर प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या या मागणीला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आज हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये सुरू आहे. या अभियानांतर्गत लाखो महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तकला, कापड, मसाले, पापड, लोणची, सेंद्रिय उत्पादने, हस्तनिर्मित वस्तू अशा विविध लघुउद्योगांमध्ये कार्यरत आहेत. या महिलांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी “महालक्ष्मी सरस” प्रदर्शन, जिल्हा व विभागस्तरीय सरस मेळावे, आठवडी बाजारातील स्टॉल तसेच “उमेदमार्ट” ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून विक्रीची संधी देण्यात येत आहे.

तथापि, महिलांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी, विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर विक्री होईल अशी हक्काची बाजारपेठ उभारण्याची गरज लक्षात घेऊन दि. २९ जुलै २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र)” उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संदर्भित शासन निर्णय निर्गमित झाला असून, त्यातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून तुळजापूरची निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर हे आई तुळजाभवानी देवीचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक देश-विदेशातून दर्शनासाठी येथे येतात. या भाविकांसाठी महिलांनी तयार केलेली स्थानिक, दर्जेदार आणि पारंपरिक उत्पादने उपलब्ध करून देण्याची मोठी संधी उमेद मॉलमुळे निर्माण होणार आहे. यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.

एकूणच, तुळजापूर येथे उमेद मॉल उभारण्याचा निर्णय हा महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि पर्यटनाशी जोडलेला विकास साधणारा ठरणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी हा निर्णय विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

Previous Post

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

Next Post

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

Next Post
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Nagarparishad Election

धाराशिव नगरपरिषद आरक्षण सोडत; “या” प्रवर्गासाठी सुटले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, चुरस वाढली…

5 months ago
dharashiv district ranks first

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

7 months ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

7 months ago
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!
  • खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.