• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 29, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

Terna Vruttant by Terna Vruttant
July 28, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS
0
integrated draft plan dharashiv

पर्यटन प्रारूप विकास आराखडयाची बैठक

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक आणि प्राचीन पर्यटनस्थळांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या भक्तिपीठाचे त्याला मोठे आशीर्वाद लाभलेले आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीला प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचा एकत्रित प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे ‘मित्र’ चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.(integrated draft plan dharashiv)

रोजगार निर्मिती व आर्थिक सबलीकरणाचे उद्दिष्ट

धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक सबलीकरणाच्या हेतूने नळदुर्ग, येडशी, तेर व येरमाळा आदी पर्यटन स्थळांचा एकात्मिक विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘मित्र’ संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्न वृद्धीवर भर देत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यावर नियोजनबद्ध काम सुरू आहे. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहेत. या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील या चार पर्यटन स्थळांचा प्रारुप एकात्मिक विकास आराखडा २० ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्याचे ठरले आहे. या बैठकीस तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. शोभा जाधव, तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, तहसीलदार अभिजित जगताप, पर्यटन विभागाच्या श्रीमती जया वहाने, सल्लागार श्रीमती नेहा शितोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.  

Related posts

75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

July 29, 2025
Maharashtra Cabinet Decision

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

July 29, 2025

नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करत विकास साधला जाणार

नळदुर्ग येथील किल्ला व सभोवतालच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करत विकास साधला जाणार आहे. तसेच बसवसृष्टी व वसंतराव नाईक स्मारकासह इतर बाबींचा विचार करून ‘ रोप-वे’, ‘ हॉट एअर बलून’ यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा देखील या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. येडशी येथील रामलिंग अभयारण्यासह श्री क्षेत्र रामलिंग मंदिर व परिसराचा विकास, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला दुर्गादेवी डाक बंगला, जुनी रेल्वेलाईन व स्टेशन तथा जुने विठ्ठलवाडी गाव मूळ ऐतिहासिक रूपात पुन्हा एकदा नव्याने साकारण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र आई येडेश्वरी देवीमंदिर परिसरात आवश्यक भूसंपादनासह एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तेर गावाचादेखील स्वतंत्र विकास आराखडा

प्राचीन ‘तगर’चा इतिहासाला असलेली वैभवशाली प्राचीन झळाळी पुन्हा एकदा यानिमित्ताने मिळणार आहे. राज्यातील सर्वात प्राचीन मंदिर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्या विकास कामांसह तेर गावाचादेखील स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जात आहे. त्यातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळून त्यातून स्थानिक रोजगार निर्मिती वाढेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

Next Post

ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्यातील दहशदवाद्यांचा खात्मा

Next Post
Operation Mahadev

ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्यातील दहशदवाद्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Navodaya Vidyalaya players for national competition

तुळजापूर नवोदय विद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

3 hours ago
रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

2 months ago
धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

4 days ago
अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील
  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
  • “रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

Category

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

July 29, 2025
Maharashtra Cabinet Decision

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

July 29, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.