धाराशिव मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आलं आहे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंनी आश्वासन दिलं आहे. यावेळी महसूलमंत्री बावनकुळेंसह महसूल विभाग अंतर्गत, भूमी अभिलेख, मुद्रांक शुल्क तथा नोंदणीसह इतर बाबींचे निवेदने स्वीकारून त्याचा निपटारा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.(Dharashiv Janata Darbar)
जनता दरबाराच्या माध्यमातून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या मागण्या आणि समस्यांची नोंद बावनकुळे यांनी करून घेतली. तसेच गायरान जमिनीशी संबंधित प्रशानंवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन महसुलमंत्र्यांनी निवेदन देणाऱ्या नागरिकांना दिले. नागरिकांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आजच्या जनता दरबारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्याच्या वाटेवर आहेत अशा आशयाच्या प्रतिक्रिया जनता दरबारात सहभागी झालेल्या नागरिकांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्यासह जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.