• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, April 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

Terna Vruttant by Terna Vruttant
April 13, 2026
in धाराशिव
0
Eknath Shinde Dharashiv

Eknath Shinde Dharashiv

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी धाराशिवकरांच्या वतीने मानले आभार 

धाराशिव: धाराशिव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या’ दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ नेहाताई काकडे यांनी धाराशिव वासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद मानले आहेत.

Related posts

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

April 9, 2026

नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री महोदयांना धाराशिव नगर परिषदेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे मागणी पत्र दिले होते. यामध्ये शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, उद्यान निर्मिती आणि नाट्यगृह दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या 9 कामांचा समावेश होता.

या मागणीची दखल घेत, विशेषतः शहरातील कलावंत आणि रसिकांची सोय विचारात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जाहीर केला. धाराशिव नगर परिषद ही ‘अ’ वर्ग नगर परिषद असून शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाट्यगृहाची अवस्था पाहता त्याच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. आमच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला आहे. याबद्दल संपूर्ण धाराशिव शहरवासियांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद मानत या भरीव निधीमुळे आता नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात एकूण १२८.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी ११ कोटी, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पासाठी ९ कोटी, अमृत २.० योजनेच्या स्वहिस्सासाठी २४ कोटी, अग्निशामक व्यवस्थेच्या बळकटी करणासाठी रु ४.५० कोटी आणि नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास कामांसाठी २१ कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे. नाट्यगृहासाठी केलेल्या मागणीला यश आले असून निधी मंजूर झाल्यामुळे इतरही विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

6 months ago
MLA Sawant's instructions to tehsildars

आमदार सावंतांचा तहसीलदारांना फोन; पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

8 months ago
MLA Ranajagjitsinha patil

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहीर वाचन;पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार -आ. राणाजगजितसिंह पाटील 

6 months ago
राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.