• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, November 28, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

Terna Vruttant by Terna Vruttant
November 28, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजन

शेती, पाणी आणि ग्रामीण जीवनाच्या वास्तवावर होणार विचारमंथन

Related posts

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

November 28, 2026
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

November 28, 2026

धाराशिव : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणाऱ्या २९ नांदी साहित्य संमेलनांच्या मालिकेतील धाराशिवचे नांदी साहित्य संमेलन रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरातील सेंट्रल बिल्डिंग परिसरातील सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ८.३० वाजल्यापासून संमेलनाच्या विविध सत्रांना सुरुवात होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन, पुणे यांच्या आयोजनातून, पर्यटन जनजागृती समिती, धाराशिव, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, देवगिरी प्रांत अंतर्गत धाराशिव जिल्हा शाखा आणि तेरणा ट्रस्ट यांच्या सहयोगाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे असणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि लेखक योगेश सोमण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पंडितराव नळेगावकर, प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांच्यासह साहित्य, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेचा गौरव वृद्धिंगत करणे, साहित्यिक चळवळ समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविणे, ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक प्रश्नांवर साहित्याच्या माध्यमातून विचारमंथन घडविणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सत्र, आदर्श शेतकरी सन्मान, प्रकट मुलाखती, परिसंवाद, कविसंमेलन, समारोप सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृती आणि पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. प्रकट मुलाखतींमधून मान्यवरांच्या अनुभवांचा आणि विचारांचा वेध घेतला जाणार आहे. कविसंमेलनातून मानवी जीवन, समाज, संस्कृती आणि ग्रामीण वास्तवाचे दर्शन घडणार आहे.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक तथा साहित्य भारतीचे प्रांत संघटनमंत्री युवराज नळे, जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, कार्याध्यक्ष प्रा. सुनीता गुंजाळ-कवडे, जिल्हामंत्री डॉ. कृष्णा तेरकर यांच्यासह समन्वय व आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्यातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेती आणि पाणीप्रश्नांवर विशेष परिसंवाद

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल या पार्श्वभूमीवर ‘शेती आणि पाणी : ग्रामीण जीवनाचे वास्तव’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. साहित्यिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील प्रश्नांचा वेध घेत त्यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून हे संमेलन अत्यंत साध्या पद्धतीने आणि सामाजिक संवेदनशीलता जपत आयोजित करण्यात येणार आहे.

‘डिव्हाईन धाराशिव’ पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन

संमेलनाच्या निमित्ताने ‘डिव्हाईन धाराशिव’ या विशेष पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक वैभव आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्ये रसिकांसमोर मांडण्यात येणार आहेत. तसेच समारोप सत्रानंतर कलाविष्कार अकादमीच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

Next Post

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

Next Post
रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पीकविम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ढोकीत जल्लोषात स्वागत

पीकविम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ढोकीत जल्लोषात स्वागत

4 days ago
Anti-drug campaign to be implemented across the district

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

1 year ago
तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

1 day ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य
  • धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

November 28, 2026
धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

November 28, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.