शिवजयंतीच्या निमित्ताने सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांची निवड
धाराशिव : ‘शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिवच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये धाराशिव जिल्हा, शहर, तालुका, महिला आघाडी तसेच ऑटो रिक्षा विभागाच्या कार्यकारिणीचा समावेश आहे. बायपास रोड धाराशिव येथील श्री गणेश मंगल कार्यालयात रविवारी, (दि. २२ नोव्हेंबर) ही बैठक झाली,’ अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष गुंडोपंत जोशी यांनी दिली.
जिल्हा उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर म्हणाले, ‘समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि शिवसंस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विविध कार्यकारिणींच्या निवडीनंतर समितीच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी व हालग्यांच्या निनादात जल्लोष केला.’
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समितीचे संघटन अधिक मजबूत करून शिवकार्याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्हा कार्यकारिणी
जिल्हाध्यक्षपदी गुंडोपंत जोशी, उपाध्यक्षपदी मंगेश निंबाळकर, सचिवपदी आकाश भोसले, कार्याध्यक्षपदी ॲड. जयप्रकाश साळुंखे, संघटकपदी आशिष क्षीरसागर, प्रवक्तेपदी अक्षय खोबरे, कोषाध्यक्षपदी रमण आगळे, प्रसिद्धी प्रमुखपदी बालाजी भोसले आणि सोशल मीडिया प्रमुखपदी शुभम शेळके यांची निवड करण्यात आली.
धाराशिव शहर कार्यकारिणी
शहराध्यक्ष रामानंद माडेकर, उपाध्यक्ष अविनाश रणखांब, सचिव आदित्य मुंडे, कार्याध्यक्ष बालाजी खोचरे, संघटक गणेश पाटील, प्रवक्ता अनंत झाडके, कोषाध्यक्ष सूर्याजी कचरे, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर ढेकणे आणि सोशल मीडिया प्रमुख आकाश कावळे.
धाराशिव तालुका कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष सचिन खापरे (बेंबळी), उपाध्यक्ष सचिन पाटील (तडवळा), कार्याध्यक्ष विशाल घोडके (किणी), संघटक ज्ञानेश्वर वीर, प्रवक्ता सुमित दुधभाते (खामसवाडी), कोषाध्यक्ष अजिंक्य देशमुख (पोहनेर), प्रसिद्धी प्रमुख किरण चव्हाण (बेंबळी) आणि सोशल मीडिया प्रमुख पोपट भोसले (बुकनवाडी).
महिला आघाडी कार्यकारिणी
महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रेखा लोमटे, उपाध्यक्षपदी शैला दसपुते, सचिवपदी मोनाली भोसले, कार्याध्यक्षपदी श्वेता दुरुगकर, संघटकपदी ज्योती सपाटे, प्रवक्तेपदी पूजा पाटील, कोषाध्यक्षपदी प्रतीक्षा शिंदे, प्रसिद्धी प्रमुखपदी रेणुका शिंदे आणि सोशल मीडिया प्रमुखपदी कृतिका दसपुते यांची निवड झाली आहे.
ऑटो रिक्षा कार्यकारिणी
ऑटो रिक्षा विभागाच्या अध्यक्षपदी विशाल कतारी, उपाध्यक्षपदी अनिल सूर्यवंशी, सचिवपदी अजय भगत, कार्याध्यक्षपदी अजय तनमोर, संघटकपदी सूरज खैरे, प्रवक्तेपदी हनुमान सूर्यवंशी, कोषाध्यक्षपदी गणेश कदम, प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश शिंदे आणि सोशल मीडिया प्रमुखपदी संदीप निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


