तुळजापूर – तुळजापूर शहरातील ‘संगीता स्पीकर व सारंग सप्लाय मंडप डेकोरेशन’ या दुकानाला दोन दिवसांपूर्वी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सारंग भोसले यांचे हे दुकान जळून खाक झाले. भोसले यांचा तुळजापूर परिसरात मंडप डेकोरेशन सप्लाय आणि स्पीकरचा मोठा व्यवसाय आहे. त्या दुकानालाच आग लागल्याने मोठे नुकसान झाले. भाजप युवा नेते मल्हारदादा राणाजगजितसिंह पाटील यांनी या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
उद्योजक सारंग भोसले व त्यांच्या कुटुंबीयांशी मल्हार पाटील यांनी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि त्यांना धीर दिला. संकटाच्या या कठीण प्रसंगी भोसले कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच आगीमुळे झालेल्या नुकसानापोटी त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी सारंग भोसले यांचे कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

