• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, October 30, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

Terna Vruttant by Terna Vruttant
October 30, 2026
in मुख्य बातम्या
0
बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२०० विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा जागर

तालुका पोलिसांच्या ‘एकता दौड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related posts

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

October 30, 2026
एनएचएममधील २८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा मार्ग मोकळा

एनएचएममधील २८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा मार्ग मोकळा

October 29, 2026

बार्शी : राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देत बार्शीत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि २०० विद्यार्थ्यांनी ‘एकता दौड’मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने या दौडचे व अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. उदय शिंदे यांच्या श्री करिअर अकॅडमी आणि अश्रफ सर यांच्या स्प्रिंट किंग अकॅडमीतील एकूण २०० तरुण विद्यार्थी या दौडेमध्ये सहभागी झाले होते.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली दौड उपळाई रोडमार्गे बार्शी चौकापर्यंत गेली. तेथून माघारी फिरून पोलीस ठाण्यात दौडेचा समारोप झाला. मार्गावर सहभागींनी राष्ट्रीय एकता आणि अमली पदार्थविरोधी घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले.

या वेळी सुहास जगताप आणि अक्षय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबाची होणारी हानी आणि समाजावर पडणारा विपरित प्रभाव या बाबत त्यांनी माहिती दिली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि विधायक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशाच्या एकीकरणातील योगदानाचेही या वेळी स्मरण करण्यात आले. देशाची एकता आणि अखंडता जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, सामाजिक सलोखा राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश देण्यात आला. पोलीस आणि प्रशिक्षण अकॅडमींच्या संयुक्त सहभागातून राबवलेल्या या उपक्रमात शारीरिक तंदुरुस्ती, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 

Previous Post

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
Terna Egg college Dharashiv

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

10 months ago
Shibu Soren

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

1 year ago
manoj jarange protest

“आजपासून पाणीही पिणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई
  • आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!
  • एनएचएममधील २८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा मार्ग मोकळा

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

October 30, 2026
एनएचएममधील २८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा मार्ग मोकळा

एनएचएममधील २८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा मार्ग मोकळा

October 29, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.