• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !

Terna Vruttant by Terna Vruttant
October 27, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, धाराशिव
0
शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शासनाचा निर्णय होईपर्यंत सक्तीच्या वसुलीला लगाम घाला


पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Related posts

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026
धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

October 24, 2026

धाराशिव : नांदेड जिल्ह्यात बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तकाद्यांमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अथवा अन्य कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी शासनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि यंत्रणांनी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना दिले आहेत.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटे, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि आर्थिक अडचणींमुळे तो आधीच संकटांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत कर्जाच्या वसुलीसाठी वारंवार तगादा लावणे, दबाव आणणे किंवा मानसिक त्रास देणे, हे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर घालणारे ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, अशी भूमिका पालकमंत्री सरनाईक यांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा

धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्या त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. त्यांना धीर देणे आवश्यक आहे. तसेच परभणी, नांदेड अशा जिल्ह्यामध्ये कर्जबाजारीपणामुळे दुर्दैवाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तसा प्रकार धाराशिवमध्ये घडू नये यासाठी शासकीय यंत्रणेने दक्ष रहावे. किंबहुना भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांननी प्रशासनाला दिला आहे.

खाजगी सावकाराकडून पिळवणूक होत असल्याची तक्रार आल्यास कडक कारवाई करावी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रचंड खचला आहे. अशा परिस्थितीमध्ये खाजगी सावकाराकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याला तकादा लावल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडू शकते. अशा तक्रारी उद्भवल्यास संबंधित खाजगी सावकारावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अन्य कर्जांसंदर्भात शासनाकडून निर्णय होईपर्यंत संबंधित यंत्रणांकडून अनावश्यक दबाव आणला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित विभाग, बँका तसेच वसुली यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांची मानसिक सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याची आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हा या निर्देशामागील मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Previous Post

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Registration of 9 parties in the state cancelled

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

1 year ago
suspension of the work of the Dpdc has been lifted

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवली,अजित पवार यांची घोषणा

1 year ago
Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

5 months ago
Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !
  • तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!
  • धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026
धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

October 24, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.