• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 17, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणूक 

Terna Vruttant by Terna Vruttant
October 17, 2026
in मुख्य बातम्या, POLITICS, धाराशिव
0
मराठवाडा पदवीधर निवडणूक 
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Related posts

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

October 17, 2026
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

October 16, 2026

धाराशिव : ‘महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे आणि ताकदीने निवडणुकीला सामोरे जात, विजयाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे गरजेचे आहे. पदवीधर निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना धाराशिवमधून अधिक बळ देऊ या,’ असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात महायुतीची संवाद सभा पार पडली. त्यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. कोल्हापूर-सांगली भागातून धाराशिवमध्ये पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न, धाराशिव मध्ये साडेतीन किमी मार्गाचे विमानतळ विकास आणि जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्याच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न यांमधून विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.’

‘आपल्या धाराशिवच्या विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी असण्याचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातही युतीचाच आमदार असायला हवा. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करायला हवे. तसेच मतदानादिवशी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रोत्साहित करून एकही मत वाया जाणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन पाटील यांनी केले.

खासदार सुनील तटकरे यांनी देखील आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास यावेळी व्यक्त केला. येत्या २३ ऑक्टोबरला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार बसवराज पाटील, आ. विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुरेश बिराजदार, भाऊसाहेब खरसडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

Next Post

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

Next Post
धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

5 months ago
suspension of the work of the Dpdc has been lifted

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवली,अजित पवार यांची घोषणा

1 year ago
Body of young man swept away in flood found after 3 days

वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसानंतर सापडला

1 year ago
integrated draft plan dharashiv

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी
  • मराठवाडा पदवीधर निवडणूक 
  • मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

October 17, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणूक 

मराठवाडा पदवीधर निवडणूक 

October 17, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.