• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
October 15, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA - Ranajagjitsinha Patil
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा पीकविमा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के बांधवांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही अशा शेतकरी बांधवांनाही मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे पीकविमा न भरलेला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा, यासाठी बुधवारी आपण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडला. त्याला मान्यताही देण्यात आली असून हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(MLA – Ranajagjitsinha Patil)

धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण ७३३ गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक १२५ गावांचे त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील १२२, भूम, परंडा आणि उमरगा तालुक्यातील ९६, लोहारा तालुक्यातील ४७, कळंब तालुक्यात ९७ तर वाशी तालुक्यातील बाधित गावांची संख्या ५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांच्या वाट्याला या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आले आहे. जिल्ह्यात पाच लाख ३४ हजार ३८२ हेक्टरहुन अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच लाख ५४३२ हेक्टर जिराईत, २२ हजार ६११ हेक्टर बागायत तर सहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्र फळपिकांचे आहे. बाधित असलेल्या संपूर्ण क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण नुकसानीची तीव्रता अभूतपूर्व अशीच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ६८३ विहिरी खचल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

पशुधन दगावले आहे, घरांची पडझड झाली आहे. शेतातील ड्रीपसेट, पंपसेटही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत. पिकांचा चिखल झाला आहे. घरात साठवलेल्या धान्याचीही नासाडी झाली आहे. मिळणारे अनुदान, विविध प्रकारची मदत आणि पीकविमा या सर्व बाबींचा मेळ घातला तरीही अनेकांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. जेणेकरून बाधित शेतकरी बांधवांना अधिकाधिक दिलासा मिळू शकेल. जिल्ह्यातील बाधित असलेल्या एकूण सहा लाख ३९ हजार ९२७ शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के शेतकरी बांधवांनी यंदा पीकविमाच भरला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ज्यांनी पीकविमा भरला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळावा यासाठी आपले महायुती सरकार अत्यंत संवेदनशीलपणे विचार करीत आहे. पुढील टप्प्यात ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र ज्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनाही राज्य सरकारकडून भरीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसा ठराव मांडला. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा ठराव आपण राज्य सरकारकडे पाठवणार आहोत. सरकार गांभीर्याने पीक विमा न भरलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्याचा विचार करीत आहेच. त्याव्यतिरिक्त क्राऊड फंडिंगच्या माध्यमातूनही ज्यांच्या नुकसानीची व्याप्ती खूप अधिक आहे त्या सर्व शेतकरी बांधवांचे नुकसान भरून काढण्यासाठीही आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे ज्यांनी पीकविमा भरलेला नाही मात्र त्यांचे नुकसान मोठे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना खचून जाऊ नये आपले महायुती सरकार ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

Next Post
Honesty of security guard in Tulja Bhavani temple

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv ITI

Dharashiv ITI शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी, अद्ययावत संकुल बांधण्यात येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

8 months ago
HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

5 months ago
६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

9 months ago
CM Devendra Fadnavis

राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.