• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

शिपाईच निघाला मास्टरमाइंड;तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा

Terna Vruttant by Terna Vruttant
October 14, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, मुख्य बातम्या
0
Dharashiv Police
225
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून, त्याच्याकडून ११ लाख रुपयांची रोकड आणि २ किलो १५९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.(Dharashiv Police)

काय आहे प्रकरण?

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026

दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेतून ३४,६०,८६० रुपये रोख आणि २ किलो ७२२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरगरिब नागरिकांनी त्यांच्या गरजेपोटी तारण म्हणून ठेवलेल्या दागिन्यांची ही चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांपुढे होते मोठे आव्हान

गुन्ह्याचे गांभीर्य आणि चोरीच्या रकमेचे मोठे मूल्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना याच शाखेतील शिपाई दत्ता कांबळे याच्यावर संशय आला. मात्र, दत्ता हा उच्चशिक्षित असल्याने आणि त्याने पूर्वनियोजन करून गुन्हा केल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते.

अखेर नागपुरातून आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दत्ता कांबळे हा नागपूरमध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दत्ताने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेला मुद्देमाल काढून देण्याची तयारी दर्शवली.आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपये रोख आणि २ किलो १५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

Next Post

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहीर वाचन;पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार -आ. राणाजगजितसिंह पाटील 

Next Post
MLA Ranajagjitsinha patil

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहीर वाचन;पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार -आ. राणाजगजितसिंह पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

NISAR launched

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

11 months ago
काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

6 months ago
Pratap Sarnaik at dharashiv

पालकमंत्री सरनाईक स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

10 months ago
Dharashiv Sahitya Sammelan

धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.