• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, September 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

जिल्ह्यात आजपासून विशेष ग्रामसभांचे आयोजन, पंचनाम्याचे जाहीर वाचन होणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
October 14, 2025
in BREAKING NEWS, Uncategorized, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA Ranajagjitsinha Patil
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पिकांसह गावांमधील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले होते. या पंचनाम्यांचे जाहीर वाचन गावागावात ग्रामसभाघेऊन करण्यात यावे तसेच पायाभूत सुविधांची मदत मिळवण्यासठी ग्रामसभेत प्राधान्यक्रम ठरवून ठराव करण्यात यावे असे निर्देश आ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. परिणामी आजपासून धाराशिव जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.(MLA Ranajagjitsinha Patil)

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज पुरवठा करणारे पोल, डीपी कोसळ ली आहे, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाईन विस्कळीत झाल्या आहेत.पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हि मदत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने अतिनिकडीच्या कामांचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत ठराव करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

गावागावात पंचनाम्याचे वाचन

नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्याच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनाम्यात नुकसानीचे सविस्तर वर्णन असेल. गावागावात आजपासून होणाऱ्या ग्रामसभांमध्ये पंचनामयाचे जाहीर वाचन केले जाईल. पंचनाम्याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यावे, त्यात दुरुस्ती असल्यास, पंचनाम्यात आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. या पंचनाम्यांमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसानही योग्यप्रकारे नोंदवून घ्यावे, कुठलीही बाब पंचनाम्यात नोंदवण्याची राहून जाऊ नये आणि कोणीही या शासनाच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना केले.

पशुधनासाठी मदत

दगावलेली, वाहून गेलेली जनावरं यांच्या बाबतीत जी मर्यादा होती ती आता सरकारने काढली आहे. परिणामी जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. सर्वच पशुधनाला सरसकट मदत केली जाणार आहे.

विहीरीचे नुकसान झाले असल्यास आणि जमीन खरवडून गेली असल्यास मदत

विहिरीत पुरामुळे गाळ आला असेल त्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३० हजारांची मदत दिली जाईल. जमीन खचली असेल, खरडून गेली असेल तर अशा नुकसानीसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. ३ लाखापर्यंत जमीन दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.

पडझड झालेल्या घरांसाठी वेगळी मदत

पुराच्या तडाख्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. अंशतः घर पडलेली असेल तरी मदत मिळेल, अतिक्रमित जागेवर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं असेल तर त्यासाठी देखील मदत दिली जाईल.

आपापल्या गावांमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहा

नागरिकांनी आपापल्या गावांमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांना आवर्जून उपस्थित राहावे, आपापल्या नावापुढे काय नुकसान लिहिलेले आहे याची खातरजमा करा. त्यात चूक असेल तर त्याची लेखी तक्रार द्या, पोच घ्या आणि नुकसानीची नोंद करून घ्या. या प्रक्रियेत अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा असे आवाहन यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

Next Post
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

5 months ago
2215 crores assistance to farmers CM Devendra Fadnavis

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12 months ago
shri tuljabhavani temple shikhar

तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार

1 year ago
pahalgam tourist point reopen

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली पर्यटन स्थळे खुली

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.