• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

‘तारा’ प्रकल्पाला गती, ‘ग्रँट थॉर्टन’चे पथक स्थळ पाहणीसाठी दाखल;आमदार पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप

Terna Vruttant by Terna Vruttant
October 11, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
TARA Project Dharashiv
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसरात राबविण्यात येणाऱ्या “तुळजाई कृषी महसूल-वाढ अभियान अर्थात तारा (TARA)” प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध ग्रँट थॉर्टन भारत एलएलपी संस्थेच्या पथकाने शनिवार ११ऑक्टोबर रोजी स्थळ पाहणी केली. जिल्हा आणि परिसरातील तरुण शेतकरी बांधवांना त्यामुळे अत्याधुनिक शेती व रोजगाराच्या नव्या संधीचे सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहेत.(TARA Project Dharashiv)

‘ग्रँट थॉर्टन’च्या पथकाने माळुंब्राजवळील १००० एकर प्रकल्प क्षेत्राचा शनिवारी आढावा घेतला. स्थानिक पिकपद्धती, मातीची गुणवत्ता, पाण्याची उपलब्धता तसेच कृषी उत्पादक कंपन्यांच्या (FPOs) कार्याचा अभ्यास केला. तसेच या भागातील शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून कृषिआधारित उद्योगांची संभाव्यताही जाणून घेतली. प्रकल्पातील १०० एकर जागा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी (हायड्रोफिनिक्स,एरोपोनिक्स,अ‍ॅक्वापोनिक्स,कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट अ‍ॅग्रिकल्चर मॉडेल सारखे) राखीव ठेवण्यात यावी, या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांना १० ते २० गुंठ्यांचे प्लॉट्स देऊन त्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्र) उपाध्यक्ष, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी या पथकाला केली.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

तारा प्रकल्प हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. उत्पादनापासून ते प्रक्रियेपर्यंत, ब्रँडिंगपासून निर्यातीपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पातून धाराशिव जिल्हा राज्यातील आदर्श कृषी जिल्हा ठरेल असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत ५०० कृषिआधारित प्रक्रिया उद्योग आणि महिलांसाठी स्वतंत्र २०० उद्योग उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकरी बांधवांना या अभियानाशी जोडले जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व विपणन साह्य देण्यात येणार असून, त्यांना हक्काची बाजारपेठ आणि हमीभाव उपलब्ध करून देणे हा देखील या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.

पुढील पाच महिन्यात प्रकल्प अहवाल व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची प्रक्रिया : आमदार पाटील

ग्रँट थॉर्टन भारत एलएलपी या संस्थेला १८ सप्टेंबर २०२५ रोजी रु. ७२,२१,६०० किंमतीचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) कडून देण्यात आले आहेत. या संस्थेकडून पुढील तीन महिन्यांत  सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाणार असून, त्यानंतर दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची प्रक्रिया  केली जाणार आहे. ‘तारा’ प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, कोल्ड स्टोरेज साखळी, रेडी-टू-इट उत्पादन, एआय आधारित अचूक शेती आणि निर्यातक्षम पायाभूत सुविधा अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

Previous Post

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात “फेसा”चे उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

Next Post
मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

4 months ago

शेतकऱ्यांना मोठा दिलासा:धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना रु. १८९ कोटींची मदत – शासन निर्णय जारी

4 months ago
raj thakarey shetkari kamgar paksha

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

6 months ago
Dr. Ankita Vyavare succeeds in FMGE exam

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.