धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच शुभारंभ गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्निप्रदीपनाने उत्साहात झाला. या सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून माजी मंत्री आणि आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ समूहाकडून कारखान्याचे यशस्वीपणे संचालन करण्यात येत आहे. या वर्षीच्या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ भैरवनाथ समूहाचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पार पडला.(Terna Suger Factory)
समूहाचे व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांनी व विश्वनाथ मोरे यांनी सपत्नीक विधीवत पूजा केली. कार्यक्रमास तेरणा कारखान्याचे आवसायक विजय घोणसे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ, नितीन पाटील, पाटील, अॅड. अजित खोत, दत्ता तिवारी, तसेच वर्क्स मॅनेजर पी. एस. देशमुख, चीफ केमिस्ट सुंदरराव अमोल
आव्हाड, चीफ अकाउंटंट पी. टी. बिराजदार, सुरक्षा अधिकारी राजभाऊ लाड, शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड, राहुल वाकुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन अनिल सावंत म्हणाले, की मोठ्या अडचणींवर मात करून सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठीच भैरवनाथ समूहाने कारखान्याचे संचालन हाती घेतले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली असून
परिसरात ऊसही मुबलक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे कारखान्याकडे ऊस द्यावा. ऊस दराबाबत चिंता करण्याचे कारण नाही. गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्यात डॉ. तानाजीराव सावंत ऊस दराची घोषणा करतील असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमानंतर भैरवनाथ सम हाचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या निवडीबद्दल ढोकी ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल समुद्रे यांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला.








