• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय

Terna Vruttant by Terna Vruttant
September 30, 2025
in BREAKING NEWS, कृषी, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याच्या विकासाला आणि नागरिकांच्या कल्याणाला गती देण्याचा या निर्णयांचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळत बैठकीत झालेले निर्णय सर्व सामान्यांना डोळ्या समोर ठेवून घेण्यात आल्याचे यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Cabinet decision 30th sep 2025)

कर्करोग उपचारांसाठी महत्त्वाचे पाऊल
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित केले आहे. या धोरणामुळे नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यभरातील 18 रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन’ (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार आहे. त्यासाठी भागभांडवलासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

राज्याच्या उद्योगांना बळ देणारे GCC धोरण
उद्योग विभागाने ‘महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर – GCC) धोरण 2025’ मंजूर केले आहे. ‘विकसित भारत 2047’ च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी हे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. या धोरणामुळे राज्यात गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.

सौर कृषी पंपासाठी निधी; विजेच्या दरात वाढ
ऊर्जा विभागाने औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी दिली आहे. या अतिरिक्त करातून जमा होणारा निधी प्रधानमंत्री कुसुम घटक-ब आणि अन्य योजनांअंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता वापरला जाईल.

प्रशासनात गतिमानता आणणार ‘महाजिओटेक’
नियोजन विभागाने ‘महाजिओटेक महामंडळ’ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) वापरून प्रशासनात गतिमानता आणणे, हा या महामंडळाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. यामुळे विविध क्षेत्रांत धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होईल. तसेच, विधि व न्याय विभागाने सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक खर्चास मंजुरी दिली आहे.

Previous Post

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Next Post

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

mumbai local blasts 2006

Mumbai local blasts : 2006 च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष मुक्त; उच्च न्यायालयाचा निर्णय

6 months ago
PM Modi

PM Modi : नरेंद्र मोदींचा नवा विक्रम; इंदिरा गांधीना टाकलं मागे

6 months ago
long distance train canceled due to heavy rain

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

5 months ago
14000 police constaable bharti

महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूशखबर, 15 हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.