धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त आहे. परिणामी बँकांनी शेतक-यांची खाती होल्ड करू नये, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई कर्जवसुली स्वरूपात वळती करून घेऊ नये असे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले होते. तरीही काही शेतकरी बांधवांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा आल्या होत्या.शेतकऱ्यांना नोटीस पाठवणाऱ्या बँकांच्या व्यवस्थापकांवर कारवाई केली जाईल असा इशारा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.(MLA RanaJagjitsinha patil)
हतबल झालेल्या शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारचे नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे. अतिवृष्टीने उधवस्त झालेल्या शेतकऱ्यांना हि मदत मोलाची आणि त्यांना आधार देणारी आहे. मात्र हि मदतच जर बँकांनी कर्ज स्वरूपात वळती करून घेतल्यास शेतकऱ्यांच्या पदरी काही पडणार नाही. शेतकरी आणखी संकटात सापडेल. अशावेळी बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास बँकांच्या व्यवस्थापनावर सक्त कारवाई करण्यात येईल. कुठल्याही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसा बजावू नये असे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीसुद्धा शेतकरी बांधवांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी त्वरित संपर्क साधावा. आवश्यक असल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली समस्या मांडावी. अशा बँक मॅनेजर वर सक्त कारवाई केली जाईल असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.








