सरकारने आर्थिक बाबींशी निगडित विविध नियमांत केलेले बदल पुढील महिन्यापासून लागू होत आहेत. १ ऑक्टोबर २०२५ पासून होणारे हे बदल कोणते, त्याचे परिणाम काय, हे जाणून घेऊया…(Government impliment mejor changes from 1october)
१. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठे बदल
१ ऑक्टोबर २०२५ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. गैर-सरकारी क्षेत्रातील सदस्यांना मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) खाली इक्विटीमध्ये १००% पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ, १ ऑक्टोबर पासून NPS चे बिगर-सरकारी सदस्य पेन्शनची संपूर्ण रक्कम शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवू शकतील. यापूर्वी, इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा ७५% होती.
यासोबतच, सरकारी क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडूनही पीआरएएन (PRAN – Permanent Retirement Account Number) उघडण्यासाठी ई-पीआरएएन (e-PRAN) किटसाठी १८ रुपये आणि फिजिकल पीआरएएन कार्डसाठी ४० रुपये शुल्क आकारले जाईल. यामध्ये वार्षिक देखभाल शुल्क प्रति खाते १०० रुपये असेल. अटल पेन्शन योजना (APY) आणि NPS लाइट सदस्यांसाठी पीआरएएन उघडण्याचे शुल्क आणि देखभाल शुल्क १५ रुपये असेल, तर व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.









