शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पूरपरिस्थितीमुळे घराघरांत पाणी तर शिरलंच आहे, पण त्याचबरोबर शेतीमध्ये पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.(2215 crores assistance to farmers CM Devendra Fadnavis)
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढच्या आठ ते दहा दिवसांत पैसे जमा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करुन मदतीचे आदेश दिले आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींहून अधिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढच्या आठ ते दहा दिवसांत पैसे जमा होती. अद्यापही हे थांबलेलं नाही. पंचनामे करुन मदत करणं हे ऑनगोईंग राहणार आहे. एखाद्या जिल्ह्यात कमी मदत दिसली तरीही ते नंतर वाढणार आहे कारण जशा गोष्टी समोर येत आहेत तशी मदत करणं सुरु आहे.
मृत्यू किंवा दुर्दैवी घटना घडल्यास जिल्हाधिकारी स्तरावर मदतीचे आदेश
मृत्यू किंवा दुर्दैवी घटना घडल्यास जिल्हाधिकारी स्तरावर मदतीचे आदेश दिले आहेत. पुरामुळे जी घरांची हानी होते त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे ते आम्ही पाहिलं आहे. पालक मंत्र्यांनाही पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यास सांगितलं आहे. मी देखील काही जिल्ह्यांना भेट देणार आहे. अति पावसामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्यावर आमचा भर आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.









