• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home कृषी

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

Terna Vruttant by Terna Vruttant
September 22, 2025
in कृषी, BREAKING NEWS, INFORMATIVE, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Agriculture Colleges in Maharashtra
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ झाली असली तरी यामध्ये बीएस्सी ॲग्रीकल्चर या शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जागा रिक्त राहात असल्याने यंदा आठ महाविद्यालये बंद करण्यात आली. परिणामी यंदा जागा रिक्त राहण्याचे प्रमाण घटले. यंदा अवघ्या २ हजार ९३७ जागा रिक्त राहिल्या. त्याचवेळी कृषी अभ्यासक्रमाच्या १७ हजार ६६० जागांपैकी १४ हजार ४१७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. (Agriculture Colleges in Maharashtra)

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी. एस्सी कृषी, बी. एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी. एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी. टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी. एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ शाखांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून जागा रिक्त होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीअंतर्गत असलेल्या नऊ शाखांच्या जागांमध्ये यंदा घट होऊनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला अधिक प्रवेश झाले आहेत. तसेच जागा कमी झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही घटले आहे.

ही आठ महाविद्यालये बंद

दापोली विद्यापीठाशी संलग्न असलेली चार तर राहुरी विद्यापीठाशी संलग्न चार महाविद्यालये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये बंद करण्यात आली. दापोली विद्यापीठांर्तगत असलेले रत्नागिरीमधील डॉ. बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मुरबाडमधील उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय त्याचप्रमाणे राहुरी विद्यापीठांतर्गत येत असलेले पुण्यातील वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, धुळ्यातील कृषी महविद्यालय, अहिल्यानगरमधील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, सोलापूरमधील श्रीराम व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय ही आठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

Next Post

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Next Post
Ghatasthapana Tuljapur

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA Ranajagjitsinha Patil

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील

8 months ago
Body Donation Dharashiv

धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देहदान

11 months ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

9 months ago
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.