स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ जवळ येत असताना कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असुन जिल्ह्यातील 8 पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे. 8 पैकी 2 सभापती जागा खुले अर्थात सर्वसाधारण प्रवर्ग , 6 सभापती आरक्षीत जागा आहेत.(panchayat samiti dharashiv)
2 सभापती जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी,1 जागा अनुसूचित जातीसाठी, 1 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, 1 नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी महिला, 3 सभापती जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील सोडत लवकरच निघणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, भुम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा, तुळजापूर, उमरगा अश्या 8 पंचायत समिती असुन जिल्हा परिषदेचे 55 गट आहेत तर पंचायत समितीचे 110 गण आहेत.








