मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील बुधवारी (दि.१७) धाराशिवच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बुधवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजता ते धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५१ फुटी स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन करणार आहेत.या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.(Manoj Jarange patil at Dharashiv)
मराठा सेवकांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला धाराशिव शहरात स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन होणार असल्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी मराठ सेवकांनी सुरू केली आहे. या यावेळी जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची बैठक घेऊन हैदराबाद गॅझेट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर प्रथमच ते धाराशिव येथे येत आहेत, या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे. धाराशिवमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.









