महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे.(Acharya Devvrat)
सी.पी राधाकृष्णन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत. या संदर्भातील निवदेन राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलं असून या संदर्भातील वृत्त द हिंदूने दिलं आहे.
निवेदनानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्तव्याव्यतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसेच सी.पी. राधाकृष्णन यांची गुरुवारी (११ सप्टेंबर) उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यामुळे त्यांनी राज्यपाल पद सोडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.