मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावत आहेत. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने अनेक रस्ते बंद आहेत, वाहतुकीसाठी वळवले जात आहेत. त्यामुळे वाहनाने ये-जा करणे तसेच पार्किंग करणे कठीण होणार आहे. त्यात पावसामुळे अडचणींमध्ये आणखीनच भर पडू शकते.(arrangements of protesters by Terana family)
या सर्व अडचणींना मराठा बांधवांना सामोरे जावे लागू नये यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशान्वये तेरणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथे राहण्याची व वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. गावखेड्यातून आपल्या हक्कासाठी लांबचा प्रवास करून आलेल्या बांधवांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.मोठ्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना या माध्यमातून मदत करता आली, हे मी माझे भाग्य समजतो, कुठल्याही समाजबांधवांना अडचण आल्यास खालिल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.
नवी मुंबई येथील नेरुळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात धाराशिवसह सबंध मराठवाड्यातून आलेल्या आपल्या बांधवांची तेरणा परिवाराच्या माध्यमातून सर्वतोपरी सोय करण्यात आली आहे. कोणत्याही अडचणी आल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे तातडीचे सहकार्य हवे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. श्रीहरी मुंढे – 8169880803 , दादा पवार – 9594654770.