मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख(वय ४५)रा.वरडगाव,ता.केज,जि. बीड यांना रॅलीदरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान,त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.(Maratha Protester Death Junner)
सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.