विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच पोलिसी कामकाजाचा आढावा घेतला.या बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. (Dharashiv Officers Felicitated by IG Mishra)
या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली उत्कृष्ट कामगिरी
यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी (तुळजापूर) निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक नामदेव मद्ये (तुळजापूर), पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर, पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव (तुळजापूर), पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खटके (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस निरीक्षक गणेश पाटील (बेंबळी), पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ खरड (अंबी), महिला पोलिस उपनिरीक्षक अनघा गोडगे (भरोसा सेल), पुनम ढोगरे (वरिष्ठ श्रेणी लिपिक, पो.अ.का. धाराशिव), साफौ देवेंद्रनाथ राऊत (भरोसा सेल), तसेच पोलिस हवालदार डी. के. कवटे व ए. व्ही. कंदले (अनैतिक मानवी वाहतूक कक्ष) यांचा समावेश होता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पोलिसांना सूचना
बैठकीत मिश्र यांनी उघडकीस न आलेले गुन्हे तातडीने शोधून काढावेत, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, अशा सूचना दिल्या. तसेच आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी काटेकोर तयारी करावी, असे मार्गदर्शनह त्यांनी केले. या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक शफकत आमना, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.