भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद दगडोबा व्यवहारे यांची कन्या डॉक्टर अंकिता गुलचंद व्यवहारे हिने परदेशामधून एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर भारतामध्ये देण्याची एफ एम जी ई या महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिच्यावरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तुळजापूरच्या शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत गौरवास्पद आणि प्रतिष्ठित बाब आहे. तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद आणि कुटुंबाचे प्रेम कष्ट याच्या जोरावर मुलीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने पालक म्हणून गुलचंद व्यवहारे यांनी व्यक्त केली.(Dr. Ankita Vyavare succeeds in FMGE exam)
श्री गुलचंद व्यवहारे यांचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, मित्रपरिवार, नातेवाईक नातेवाईक आणि भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी यांनी कुमारी अंकिता व्यवहारे हिचे अभिनंदन केले आहे. या यशानंतर तिने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि देवीचे आशीर्वाद घेतले. येथील संस्कार भारती तुळजापूरचे नियोजन समितीच्या वतीने कुमारी डॉक्टर अंकिता गुलचंद व्यवहारे हिच्या यशाबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.