• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 16, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

Terna Vruttant by Terna Vruttant
July 30, 2025
in धाराशिव, महाराष्ट्र
0
NEW HOSPITAL CONSTRUCTION

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला आढावा

7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आयुर्वेदीक महाविद्यालय लगत पाठीमागे ५०० खाटांच्या नवीन अद्यावत जिल्हा रुग्णालयास महायुती सरकारने मंजुरी दिली होती. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे नवीन जिल्हा रुग्णालय असणार आहे. पुढील ३० महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(new hospital construction)


सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून अगदी काही अंतरावरच नवीन ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारले जात आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवातही झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिववासियांच्या आरोग्य सेवेसाठी साकारल्या जात असलेल्या या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, नितीन काळे, सतीश दंडनाईक, अमित शिंदे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, कार्यकारी अभियंता श्री.बंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे शस्त्रक्रियागर उभारण्यात येणार


५०० खाटांच्या नवीन शासकीय रुग्णालय इमारतीचे एकूण बांधकाम ६५,९६९ चौरस मीटर असणार आहे. यामध्ये १२५ आय.सी.यु. बेड उपलब्ध असणार आहेत. या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे शस्त्रक्रियागर उभारण्यात येणार आहेत. एकूण ०५ शस्त्रक्रिया कक्ष याठिकाणी असणार आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांसाठी सुसज्ज अशी निवासस्थानेही याच परिसरात असणार आहेत. या नवीन इमारतीमध्ये रुग्णांना अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्राधान्याने भर देण्यात आला आहे.

पुणे व छत्रपती संभाजी नगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे चर्चा

वैद्यकीय संकुलाचा एकात्मिक विकास करत असताना पुढे आलेल्या अडचणींवर चर्चा करून मार्ग काढले जात आहेत. संकुलाच्या अगदी मधोमध येत असलेला १८ मीटर रुंद सार्वजनिक रस्ता बाजूने काढून देण्याबाबत देखील नगर रचना विभागाच्या पुणे व छत्रपती संभाजी नगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता यांना याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयासाठी देण्यात आलेली जमीन चढ-उताराची आहे. त्यामुळेही काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच इमारतीच्या दर्शनीय भागात सुधारणा व इतर काही अनुषंगिक बदल सुचविण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे वृक्ष लागवड व परिसराच्या सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

Next Post

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Next Post
Malegon Bomb Blast court Verdict

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

12 months ago
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

2 months ago
Shibu Soren

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

12 months ago
Tulja Bhavani Temple

Tulja Bhavani Temple : खासदार सुनील तटकरे यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतले तुळजाभवानी देवींचे दर्शन

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.