मंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या लेटर वॉरमुळे महायुतीतील वाद समोर आलाय. कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून बैठका घ्या, असे पत्र शिरसाटांनी मिसाळ यांना लिहिले होते. यावर मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून बैठका घेईन, असे उत्तर मिसाळ यांनी दिले. दरम्यान महायुती सरकारकच्या दोन मंत्र्यांमध्ये कामकाजावरून सुरु असेलेला वाद चव्हाट्यावर आला आहे . (sanjay shirsath and madhuri misal letter war)
नेमके प्रकरण काय आहे?
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहिले होते. सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना राज्यातील काही आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले उत्तर
मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना शासनाच्या १५० दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे दिलेले निर्देश उघड केले आहेत. आपल्या बैठका ही जबाबदारीचा भाग असल्याचे सांगितले. १९ मार्च २०२५ रोजी झालेले मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामकाज वाटप महाराष्ट्र शासन नियमावली १९७५ नुसार मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय झाले आहे. याशिवाय, मागील काही वर्षांतील विभागीय कार्यवाहीची माहितीही उपलब्ध नसताना, मिसाळ यांनी कोणतीही तक्रार न करता काम केल्याचे सांगितले. मिसाळ यांनी अशा बैठकींसाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित पवारांची वादात उडी, X वरील पोस्ट चर्चेत
बिनेट मंत्र्यांना डावलून राज्यमंत्री परस्पर बैठका घेत असतील तर हे नक्कीच योग्य नाही. समाजकल्याण खात्यात हे सुरु असून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ साहेबांना डावलून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या बैठका घेत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत यातून दिले जात नाहीत ना? तसं असेल तर सद्यस्थिती बघता अपवाद म्हणून याचं स्वागतच करायला हवं! अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी X वर केली आहे.