आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे लक्ष्य ठरवले होते ते 100 टक्के पूर्ण केले. आतंकवाद्यांच्या आकांना 22 मिनिटात ऑपरेशन सिंदूरमधून जमीनदोस्त केले,हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवशाली ठरणार आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान संसद अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. परिणामी पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. (Parliament Monsoon Session 2025)
संसदेत बोलू दिले जात नहीत – राहुल गांधींचा आरोप
मी सभागृहाचा विरोधीपक्षनेता आहे. माझा अधिकार असतानाही मला बोलू दिले जात नाही असा थेट आरोप राहुल गांधी(LOP Rahul gandhi ) यांनी केला. सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली पहलगाम हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात अपयश का आले याचे सरकारने उत्तर द्यावे. पहलगाम हल्ल्याच्या प्रश्नावरून सरकारने पळ काढू नये. प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणी विरोधी बाकावरील सदस्यांनी केली. भारत पाकिस्तान युध्द आपणच थांबविले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यावरूनहि विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित केले. परिणामी संसदेतील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला.