मुंबई : मुंब्रा रेल्वेस्थानकाशेजारी आज(सोमवारी) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. दोन लोकल ट्रेन जवळून जात असताना दारात लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली पडून ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भरती करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघातात राहुल संतोष गुप्ता (वय २८), केतन दिलीप सरोज (वय २३), मयुर शाह (वय ५०), विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेतील २ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मेंदूशी निगडीत उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.