अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात अतोनात नुकसान झालं आहे.अनेक गावांमध्ये पुराचं पाणी भरून पायभूत सुविधांचे देखील नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधन देखील वाहून गेलं आहे. जमिनी खरडून सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले असून त्यांना मदत वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अनेक ठिकाणी बहुभूधारक शेतकऱ्यांच्या देखील जमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.(MLA Ranajagjitsinha patil)
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून बहुभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनीती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे. यासाठी प्रशासनाला आदेश दिले असून आपण मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे बहुभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.








