तांत्रिक कारणांमुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास अडथळे निर्माण झाले होते. हे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज पासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. (kharip pik vima 2024)
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी भूषण करंजकर यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली आहे. याच पद्धतीने उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया अधिक गतीने सुरु आहे.धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४चे कापणी पश्चात नुकसान झालेल्या व पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना हि भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.