पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. या अभियानातंर्गत धाराशिव शहरात जिल्हा भारतीय जनता पाक्षाने आयोजित केलेली भव्य तिरंगा रॅली आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीत सहभागी घेतला. या रॅलीला नागरिकांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. भारत माता की जय, वंदे मातरम् या गगनभेदी घोषणांनी, हवेत लहरणाऱ्या झेंड्यांनी संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले.(grand tiranga rally at dharashiv)
रॅली दरम्यान आमदार पाटील यांनी राबवली स्वच्छता मोहीम
रॅली दरम्यान रस्त्यावर पडलेले पाणी बॉटल, झेंडे, पताके आणि साहित्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः साफ केले. याला प्रतिसाद देत विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी बघता बघता सर्व परिसर स्वच्छ केला.
तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आपली अस्मिता, संघर्ष आणि विजयाची कहाणी दडलेली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानाने आज संपूर्ण देश एकतेच्या धाग्यात गुंफला आहे.अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.तसेच तिरंगा रॅली यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अमित शिंदे, मधुकर तावडे, संपतराव डोके, खंडेराव चौरे, अनिल काळे, सुनील काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, युवराज नळे, संदीप इंगळे, नितीन शेरखाने, सागर दंडनाईक, आकाश तावडे, फरमान काझी, दत्ता पेठे, विलास लोंढे, संग्राम बनसोडे, रमण जाधव, अलीम पठाण, बिलाल रझवी यांच्यासह असंख्य शहरवासीय उपस्थित होते. तिरंगा रॅलीसाठी आपल्या तेरणा परिवारातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष कष्ट घेतले.