• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home transportation

आता येणार एसटी महामंडळाचे ‘छावा राइड’ ॲप ! ओला, उबर, रॅपिडोला जबरदस्त पर्याय

Terna Vruttant by Terna Vruttant
August 5, 2025
in transportation, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Chhava ride app maharashtra government
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्रालयातील आपल्या दालनात केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटर पॉलिसीच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.(Chhava ride app maharashtra government)

यावेळी सरनाईक म्हणाले की, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि खाजगी कंपन्यांच्या शोषणातून प्रवासी व चालकांना मुक्त करणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस (e-bus) या वाहन सेवांसाठी हे ॲप सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू केले जाईल. भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे ते म्हणाले. 

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

“छावा राईड” नावावर एकमत

या ॲपला ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ किंवा ‘छावा राईड’ यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲपला “छावा राईड ॲप” Chhava ride app हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

बेरोजगार मराठी तरुणांसाठी मुंबै बँकेचा पुढाकार

एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या या शासकीय ॲपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण-तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. या तरुणांना वाहन खरेदीसाठी मुंबै बँकेकडून 10% व्याजदराने कर्ज दिले जाईल. तसेच, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांमार्फत 11% व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे.

सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांनुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात, त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवाशांची लूट करीत आहेत. एसटी महामंडळाकडे यंत्रणा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालवण्यासाठी एसटी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांबरोबर एसटी महामंडळालाही होईल.

Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी

Next Post

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवली,अजित पवार यांची घोषणा

Next Post
suspension of the work of the Dpdc has been lifted

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवली,अजित पवार यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Malegon Bomb Blast court Verdict

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

7 months ago
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

2 months ago
Kalamb road

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

3 months ago
मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.