अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. चालू हंगामातील सर्वच पिकं जवळपास नष्ट झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात बहुतांशी भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे. जमिनीची मशागत करण्यापासून, ऊसाची लागवड करून खत पाणी घालून मोठं केलं. ऊस परिपक्व होऊन कारखान्यात गाळपासाठी जाण्याची वेळ आली आणि आतीवृष्टीने संपूर्ण पिक आडवं केलं.(MLA RanaJagjitsinha Patil)
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा आडवा झालेला ऊस कारखाने चालू होताच प्रध्यानाने गाळपासाठी घेतला जाईलअशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ऊसाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.








