धाराशिव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सवर्त्र पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. शासनाने या अभूतपूर्व नुकसानीसाठी अभूतपूर्व मदत जाहीर केल्यानंतर मदत वितरणाची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील ३० टक्के पिक विम्याचा हप्ता भरलेला नसून या शेतकऱ्यांना मिळावी असा प्रयत्न सुरु आहे. या संदर्भात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. राज्य सरकारकडे या निर्णयाबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. यामुळे पिक विम्याचा हप्ता न भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली यावेळी. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासंदर्भात अनेक मुद्द्यांची मांडणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. यावेळी पीक विमा हप्ता न भरलेल्या ३०% शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला .
या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर आमदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.








