धाराशिव येथील तरुण तडफदार पत्रकार तथा today समाचार या चॅनलचे संपादक हुकमत मुलाणी याचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. विविध वृत्तपत्रात काम करून त्यांनी नाव कमावले होते, वेगवेगळे विषय हाताळून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते.(Journalist Hukmat Mulani)
अगदी शून्यातून त्यांनी केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर पत्रकारितेच्या क्षेत्रात ठळक ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वजनिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे काल निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाणी यांचे निधन पत्रकार क्षेत्राला सलग धक्कादायक आहे.








