राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.धाराशिव नगरपरिषदेचे आरक्षण देखील जाहीर झाले असून काही ख़ुशी काही गम अशी इच्छुकांमध्ये अवस्था झाली आहे.(Dharashiv Nagarparishad Election)
धाराशिव नगर परिषद आरक्षण – ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटला आहे. सध्या धाराशिव नगरपरिषदेवर सध्या प्रशासकराज सुरु आहे. अशातच अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाची तयारी करत होते आज झालेल्या आरक्षण सोडतीत महिला ओबीसी प्रवर्गाला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक उमेदवारांचे स्वप्न झाले आहे. तर अनेक कार्यकर्ते आनंदी झाले आहे. येत्या काळात हि निवडणुकीची चुरस वाढणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे.








