मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत आता मुंबई वाहतूक पोलिसांनी इशारा दिला आहे. तसेच सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.(manoj jarange protest)
मुंबई पोलिसांनी नागरिकांनी ट्रॅफिक सिग्नलवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून समस्या कमी होतील, असा सल्ला दिला आहे. त्याचवेळी, उपोषण तीव्र करण्याची घोषणा करत मनोज जरांगे यांनी आजपासून (१ सप्टेंबर) पाणी सोडण्याचा इशारा दिला आहे आणि कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार (२९ ऑगस्ट) पासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणावर आहेत. सरकारकडे कुणबी जातीतील ५८ लाख मराठ्यांच्या नोंदी आहेत आणि त्या आधारावर त्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे. मनोज जरांगे हे आरक्षणाद्वारे ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना १० टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते आंदोलनस्थळ सोडणार नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा लढा संवैधानिक हक्कांसाठी आहे आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी समाजाला न्याय मिळेल, असं स्पष्ट मतं मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.