राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव दौऱ्यावर येणार असून उद्या दिनांक ०७ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी महसूल विभागाशी संबंधित समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. (revenue minister bavankule at dharashiv)
महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या संबंधित धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी किंवा सूचना यावेळी स्वीकारल्या जाणार आहेत. तरी महसूल विभाग अंतर्गत, भूमी अभिलेख मुद्रांक शुल्क तथा नोंदणीसह इतर बाबींचे निवेदन घेऊन नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वेळेवर उपस्थित रहावे, असे नागरिकांना आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
महसूल मंत्री दोन दिवस धाराशिव दौऱ्यावर
महसूलमंत्री बावनकुळे हे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत धाराशिव दौ-यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप पदाधीका-यांशी संवाद साधणार आहेत. या बरोबरच ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य जनता दरबार घेणार असून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौऱ्याला विशेष महत्व आहे. या बरोबरच तुळजापूरच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ते या कार्यक्रमाला हजेरी लावतील.