बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज आक्रमक झाला असुन तुळजापूर येथे हजारोच्या संख्येने एकत्र झाला आहे. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी असुन एकच गोर, लाखेरो जोर, जय सेवालाल महाराज असा नारा दिला आहे. (tuljapur banjara community fight for reservaion)
बंजारा समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन अश्या सुचना आहेत. तुळजापूर येथे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असुन मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात जिल्ह्यात रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.








