तुळजाभवानी मंदिरातील दर्शन दहा दिवस बंद राहणार आहे. १ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे मुखदर्शन भाविकांना करता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जिर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याने, मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार या काळात कोणतेही व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन किंवा देणगी दर्शन होणार नाही.(Tulja Bhavani temple)
गाभाऱ्यातील जीर्णोद्धारास सुरुवात
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टदश महाशक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ मानलं जातं. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मंदिराच्या Tulja Bhavani Temple गाभाऱ्यातील दुरुस्ती आणि शिखर भागाच्या कामांवरून स्थानिकांत आणि भाविकांमध्ये वाद सुरू होता. अखेर पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर गाभाऱ्यातील जीर्णोद्धारास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यासाठी मंदिर संस्थानाने Tulja Bhvani Temple trust जाहीर प्रगटन जारी केलं आहे. त्यात स्पष्ट करण्यात आलं की, १ ते १० ऑगस्ट या कालावधीत भाविकांनी तुळजापूरला येताना याची नोंद घ्यावी. गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीच्या आसपास जिर्णोद्धाराचे काम सुरू राहील. त्यामुळे श्रद्धेच्या दृष्टीने कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मुखदर्शनाची सुविधा सुरु राहणार आहे.