श्री तुळजाभवानी मंदिरातील देविजींची मुर्ती रविवारी (दि.७) रा. ९.५७ ते सोमवारी (दि.८) पहाटे १.३० या वेळेत चंद्रगहण असल्याने सोवळ्यात असणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात देविजींचे पुजा विधी वेळा पुढीलप्रमाणे असणार आहेत.
रविवारी पुजेस हाक मारणे, पुजारी देविजींजवळ येणे व निर्माल्य विसर्जन, देविजींची सायंकाळची सिंहासन पूजा, पंचामृत व शुद्धस्नान- साय. ६.३० ते ७.३०, घाट देणे, देविजींची आरती व धुपारती ७.३०ते ८, श्री देविजींचा छबिना – ८ ते ८.३०, जोगवा व प्रक्षाळनंतर देऊळ बंद करणे ८.३० ते ९.३०, चरणर्तीर्थ करणे – ९.३० ते ९.४५, घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी देविजींजवळ येणे व निर्माल्य विसर्जन – ९.४५ ते ९.५५, देविजींना सोवळ्यात ठेवणे – रा. ९.५७ ते १.३०, पंचामृत, शुद्ध स्नान, आरती व धुपारती – १.३० ते ४ या वेळेत होईल. सोमवारी (दि.८) देविजींची सकाळची नित्याची ६.०० वाजता आरंभ होईल. रविवारी (दि.७) देविजींच्या सायंकाळच्या २ सिंहासन पूजा होतील व अभिषेक पुजा बंद राहील, अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान माया माने यांनी दिली.