जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेले शेतकरी स्व. परमेश्वर राजेंद्र पिसाळ यांच्या कुटुंबियास माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने ३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत नसून समाजाचा एक भाग म्हणून कर्तव्य बजावत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. (MLA tanaji sawant)
यावेळी आमदार डॉ. सावंत यांनी समाजाला आवाहन करताना म्हंटले की, कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नाही. सर्वांनी धीराने काम करणे गरजेचे आहे. भविष्यात कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. हा धनादेश महेश डोंगरे पाटील यांच्या हस्ते परमेश्वर पिसाळ यांच्या आईकडे देण्यात आला. याप्रसंगी कोंबडवाडीचे सरपंच मुकुंद सोकांडे, उपसरपंच, बन्नी थोडसरे, शरद सावंत, ओम साळुंखे, सतीश लहाडे, सिदाजी जगताप, विश्व बेजगमवार,
सुनील करंजकर, छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी, सिद्धेश्वर भांदुर्गे, रामचंद्र गवळी, सुजित इंगोले, शिवाजी साळुंखे, ज्ञानेश्वर काटे, तृणाल जगदाळे, अमोल यादव, तानाजी भोरे, ईश्वर शिंदे, हनुमंत मिसाळ, बाळासाहेब पाथरकर, शिवाजी मुळीक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








