• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 2, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

Terna Vruttant by Terna Vruttant
January 3, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Tuljapur Drone Show

Tuljapur Drone Show

16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य आणि अत्याधुनिक ड्रोन शो शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ड्रोन शोने भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम यानिमित्ताने अनुभवता आला.

या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवींचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, तेरखेडा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष फरीद पठाण, अलियाज दारूवाले, तय्यब हुसेन दारूवाले, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026

यापूर्वी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव २०२५ अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी हा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तो स्थगित करावा लागला होता. अखेर शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आज श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर हा ड्रोन शो यशस्वीपणे पार पडला.

या भव्य ड्रोन शोमध्ये तब्बल ३०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, श्री तुळजाभवानी देवींची दिव्य प्रतिकृती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर आकर्षक प्रतिकृतीचा समावेश होता. विशेषतः आकाशात साकारलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या तेजस्वी प्रतिकृतीने भारावून टाकले. देवीच्या प्रतिकृतीसोबत प्रकाशयोजना आणि संगीतमय पार्श्वभूमीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आकाशात साकारताच उपस्थित भाविकांमधून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजित प्रकाशयोजना आणि संगीताच्या सुसंवादामुळे हा ड्रोन शो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. देवीच्या दर्शनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने भाविकांना मिळाली.

धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा ड्रोन शो आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अनेक भाविकांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आठवणी जपल्या. ड्रोन शोच्या सादरीकरणानंतर तेरखेडा फटाका असोसिएशनच्या वतीने आकाशात नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्याच्या रंगीबेरंगी रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या उत्सवात अधिकच भर पडली.

Previous Post

तुळजापूरमध्ये उमेद मॉल, शासन निर्णय जारी ; आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती मागणी

Next Post

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने ‘महात्मा फुले वाडा’ येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

Next Post
Krantijyoti movie team visits Mahatma Phule Wada

‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने 'महात्मा फुले वाडा' येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

dharashiv district ranks first

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

7 months ago
Speed ​​up the work of Beed to Parli railway line - Ajit Pawar

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

6 months ago
revenue minister bavankule at dharashiv

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार, नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

7 months ago
mla tanaji sawant on sanjay raut

एकनाथ शिंदेंसमोर तानाजी सावंत भडकले

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!
  • खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.