आगामी सण-उत्सव, जयंती मिरवणुका, तसेच विविध संघटनांकडून अपेक्षित आंदोलने लक्षात घेता, जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २९ जुलै रोजीच्या पहाटे १ वाजतापासून ११ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू राहणार आहे.(Curfew and disarmament orders in the district)