• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, November 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

Terna Vruttant by Terna Vruttant
November 27, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंदिर संस्थानचे विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्तांना मदतीचा हात

Related posts

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

November 27, 2026
सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

November 27, 2026

धाराशिव : राज्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. मंदिर समितीचे विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी तीन कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार व मंदिर व्यवस्थापक माया माने आणि सहकारी राहुल पाटील सास्तुरकर उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील विविध घटकांना मदतीचा आधार मिळावा, या भावनेतून तुळजाभवानी मंदिर समितीने मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

तुळजाभवानी मंदिर समितीच्या माध्यमातून या पूर्वीही विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवण्यात आला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीतही मंदिर समितीने मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते.

 यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तीन कोटी रुपयांचे योगदान देत समितीने सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे. आई तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या श्रद्धेतून प्राप्त होणाऱ्या निधीचा समाजहितासाठीही उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून मंदिर समितीने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या योगदानातून अधोरेखित झाले आहे. आई तुळजाभवानी मातेच्या कृपाशीर्वादाने राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ मिळो आणि लवकरच दुष्काळाचे सावट दूर होऊन सर्वत्र सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

Previous Post

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

Next Post

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

Next Post
सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

1 year ago
पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

12 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

१८ गायी, २३ शेळ्या, १०० कोंबड्या दगावल्या; सर्वस्व गमावलेल्या दातखिळे कुटुंबियांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

1 year ago
Minister Datta Bharane

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम
  • सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत
  • तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

November 27, 2026
सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

November 27, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.